cricket ipl 2022 ms dhoni on why ravindra jadeja quits chennai super kings captaincy

सर्व स्पून फीडिंग शक्य नाही.. धोनीनं सांगितलं जडेजाने कॅप्टनशिप सोडण्याचे कारण…

क्रीडा

मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, “जडेजाला मागच्या सिझनमध्येच तो यंदा कॅप्टन होणार हे माहिती होतं. त्याच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ होता. मी पहिल्या 2 मॅचमध्ये जडेजाला मदत केली. त्यानंतर कुणी कोणत्या साईडनं बॉलिंग करायची, तसंच अन्य सर्व निर्णय मी त्याच्यावर सोपवले. तो फक्त टॉससाठी कॅप्टन असावा असं मला वाटत नाही. स्पून फिडिंग केल्यानं कॅप्टनला मदत होत नाही. मैदानावर त्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. त्याची जबाबदारी त्यानंच घेणं आवश्यक आहे. एकदा कॅप्टन झाल्यावर अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. त्यामध्ये स्वत:च्या खेळाचाही समावेश असतो. माझ्या मते कॅप्टनसीचा त्याच्या तयारीवर परिणाम झाला. त्याची बॅटींग आणि बॉलिंग पूर्वीच्या पद्धतीनं होत नव्हती. आम्ही डिप मिडविकेटला आम्ही एक चांगल्या फिल्डरलाही मिस करत होतो. आम्ही या सिझनमध्ये 17 ते 18 कॅच सोडल्या आहेत. हा काळजीचा विषय आहे. आम्ही लवकरच यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.”

आयपीएलच्या या सामन्याआधी रवींद्र जडेजाने सीएसकेची कॅप्टन्सी सोडली होती, त्यामुळे टीमने पुन्हा एकदा धोनीला कर्णधार केलं. यानंतरच्या सामन्यात सीएसकेला विजय मिळाला. यंदाच्या आयपीएलमधला 9 मॅचमधला सीएकेचा हा तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत