धुळे : ०६ – धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी व मतमोजणीची २३ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रक्रिया पार पडली. यानंतर सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास […]
धुळे
येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार
धुळे : सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असून या प्रकल्पामुळे या परिसरातील शेती ही सुजलाम सुफलाम होवून येथील परिसरात हरीत क्रांती होईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मौजे सोंडले, ता. शिंदखेडा येथे केले. […]
धुळे जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या शाळांचे ऑडिट लवकरच – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ज्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट राहिले आहे, अशा शाळांनी लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून शाळेत अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. […]
वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कर्तव्य बजावत असताना खोल दरीत कोसळून मृत्यू
धुळे : भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना ६ जुलै, २०२३ रोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक पाय घसरुन थेट ५०० ते ६०० फुट खोल दरीत कोसळून जखमी होऊन वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची […]
मोठी बातमी : धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चार महिलांचा मृत्यू
धुळे : धुळे जिल्ह्यातील चिपलीपाडा शिवार येथील मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला गंभीररित्या भाजल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथील मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत चार […]
धक्कादायक घटना समोर, धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान
धुळे : धुळे शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं. या घटनेमध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या टँकर चालकाला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, […]
मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची जोरदार धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना…
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील वडजाई गावचा रामेश्वर भरत देवरे (वय 22) हा तरूण सैन्य भरतीसाठी मुंबईत आला होता. या भरतीसाठी वडजाई आणि परिसरातून सुमारे 25 तरुण गेलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या […]
तीन वाहनांचा विचित्र अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर 9 जण जखमी
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रक, रिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये रात्री १ वाजेच्या दरम्यान अपघात झाला, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा याठिकाणी हा अपघात घडला. जखमींना धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]
धुळ्यात पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील ६९ जणांना अन्नातून विषबाधा, रुग्णालयात दाखल
धुळे : धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील ६९ जणांना अन्नातून विषबाधा झाली. पोलीस प्रशिक्षणार्थी शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर आजारी पडले. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच 69 जणांना रुग्णवाहिकेतून डायमंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. नव्याने भरती झालेल्या […]
एकाच कुटुंबातील 5 जणांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून सर्व जण बचावले असून डायमंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अवधान परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास कौटुंबिक कलहांना कंटाळून […]