गुजरात : अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी एक खाजगी प्रशिक्षण विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात विमान चालवत असलेल्या पायलट अनिकेत महाजन यांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमान हे ‘व्हिजन फ्लाइंग इन्स्टिट्यूट’ या प्रशिक्षण संस्थेचे होते. अपघातानंतर विमानात जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार, ६ जण जखमी
जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन पर्वताच्या शिखरावर पर्यटकांच्या एका गटावर दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रारंभिक माहितीनुसार, ट्रेकिंग ट्रिपसाठी गेलेल्या पर्यटकांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये काही स्थानिक लोक आहेत आणि तीन पर्यटक आहेत. हा हल्ला आज सकाळी सुमारे […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 8 महत्त्वाचे निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यात 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मत्स्यव्यवसायास कृषी क्षेत्राचा दर्जा देणे, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला आर्थिक तरतूद, आणि अनेक अन्य विकासात्मक निर्णयांचा समावेश आहे. 1. मत्स्यव्यवसायास कृषी क्षेत्रासारखा दर्जा मंत्रिमंडळाने मत्स्यव्यवसायास कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे राज्यातील सागरी मासेमारी व […]
पतीला घर विकायला भाग पाडलं, पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली, पतीने उचललं टोकाचं पाऊल…
उत्तर प्रदेश : पत्नीने विश्वासघात केल्यामुळे व्यथित झालेल्या राम गोपाल प्रजापती (वय ५५) यांनी १५० फूट खोल खाणीत उडी घेत आत्महत्या केली. झांसी जिल्ह्यातील रक्सा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने अगोदर पतीला घर विकण्यास भाग पाडले. त्यानंतर घर विकून मिळालेले पैसे घेऊन ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पत्नीने केलेल्या […]
पुण्यात भीषण अपघात! टँकरखाली चिरडून 26 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील सातववाडी पीएमपी बस थांब्यासमोर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. डॉ. ईश्वर साहू (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, डॉ. साहू हे त्यांच्या दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात असताना, एका थांबलेल्या पीएमपी बसच्या […]
पुण्यातील 51 शाळा बोगस असल्याचा मोठा खुलासा, पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 51 अनधिकृत शाळा बोगस असल्याचे उघड झाले आहे. अलिकडच्या मूल्यांकनानंतर राज्यभरातील सुमारे 1300 संशयित शाळांची छाननी करण्यात आली. त्यात 800 हून अधिक शाळांमध्ये कागदपत्रांत त्रुटी आढळल्या, तर यापैकी 100 शाळा आधीच कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, […]
खंडाळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, अनेक जण जखमी
पुणे : खंडाळा जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (२० एप्रिल) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक – GJ 03 BT 6701) मागून इनोव्हा कारला (MH 19 BG 8067) जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी होती की […]
धक्कादायक! माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची राहत्या घरात हत्या; पत्नीवर गंभीर आरोप
बेंगळुरू: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी (२० एप्रिल) संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउटमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यांची पत्नी पल्लवीनेच त्यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पत्नीने स्वतः पोलिसांना याबाबतची माहिती दिली. राज्य पोलीस विभागाचे प्रमुख असलेल्या […]
एका तरुणीचं धक्कादायक कृत्य – एकाचवेळी सहा बॉयफ्रेंड्स, कॅफेमध्ये झाला थरार, व्हिडीओ व्हायरल
प्रेम आणि फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीनं एकाचवेळी सहा वेगवेगळ्या तरुणांशी प्रेमसंबंध ठेवले आणि अखेर या सर्व मुलांनी तिचा एकत्र सामना करत तिला जाब विचारला. हा थरारक प्रकार एका कॅफेमध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी वेगवेगळ्या वेळेस सहा मुलांना डेट करत […]