
चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचा मुद्दा गाजल्यानंतरही रस्ते खोदण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या मार्गावरील चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता स्मार्ट सिटी कंपनीकडून ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी पुन्हा फोडण्यात आला. कुलकर्णी गार्डन परिसरात सुरू असलेले हे […]
स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी आयोजित या विशेष समारंभात डॉ. गिते यांच्या सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची दखल […]
दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले […]
सुरेश रैना व शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात ईडीची कारवाई
नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या दोघांच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईचा संबंध ‘1xBet’ नावाच्या बेकायदेशीर […]
IPL 2025 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर, दुपारी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना
मुंबई : आज आयपीएल २०२५ मध्ये डबल हेडर आहे म्हणजेच एका दिवसात दोन सामने आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोईन अलीच्या जागी स्पेन्सर जॉन्सनला संधी देण्यात आली आहे. तर लखनौने गेल्या सामन्याच्या प्लेइंग-११ […]
IPL 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी, आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ शनिवार (२२ मार्च) पासून सुरू होणार आहे. या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला […]
ताज्या घडामोडी
दिवसभर थकवा जाणवतो? ‘या’ छोट्या सवयी बदलून सकाळपासून रात्रीपर्यंत राहा एनर्जेटिक
पुणे : आजकाल अनेकांना दिवसभर सतत थकवा आणि सुस्ती जाणवते. पुरेशी झोप घेतल्यावरही ऊर्जा कमी वाटत असल्यास, यामागे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असू शकतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. चुकीचा आहार, अनियमित झोप, कमी हालचाल आणि जास्त स्क्रीन टाइम ही दिवसभर थकवा आणि सुस्तीची मुख्य कारणं आहेत. ऑफिस कर्मचारी, विद्यार्थी, रात्री […]
































