नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र […]
बीड
बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर
बीड : बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध […]
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, चार-पाच जणांनी हात पाय धरून लावले सलाईन; म्हणाले, सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे […]
हसावं कि रडावं, एसटी स्थानकात येताच सीट पकडण्याची घाई, विद्यार्थी खिडकीतून शिरायला चढला, चौकट निसटली अन्…
बीड : बसमध्ये धक्का लागणे, गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधी समजतही नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. […]
पंकजा मुंडेंचे सरकारला साकडं, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, मायबाप सरकारने प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनांकडे गांभीर्याने पहावे…
मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागणी विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक […]
सरकार गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न… मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी […]
बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक, माजलगाव नगरपरिषदेमध्ये जाळपोळ
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ सुरू केली. नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. काही तासांपूर्वी आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर […]
बीड : राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर दगडफेक; गाड्या पेटवल्या, मनोज जरांगे यांच्या विरोधातील कथित वक्तव्यामुळे आंदोलक संतप्त
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही लोकांनी सोमवारी बीडमधील माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली. शेकडो आंदोलकांनी येथे डझनभर बाईक आणि कारही पेटवल्या. नुकताच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, […]
बीड जिल्हा आत्महत्या मुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : बीड जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही एकदिलाने काम करावे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शक्य त्या लाभासाठी सर्वांनी पोहोचावे आणि जिल्हा प्रगतिशील जिल्हा बनवावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची सभा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते […]
पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन परिसरात […]