नाशिक : बांधकामावर पाणी मारताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश प्रवीण राणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर भागात विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुःखद घटना घडली आहे. सात माऊली चौकात राहणारा मंगेश प्रवीण राणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराचे बांधकाम चालू […]
नाशिक
शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी, २५ वर्षीय प्रियकराला संपवले
नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी […]
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत
नाशिक : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. या बाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी […]
खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार
नाशिक : विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. खिलाडूवृत्ती जोपासलेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही तर सातत्याने पुढे जाते. विद्यार्थ्यांनी विविध खेळांतून नवनवीन कौशल्ये व प्राविण्य आत्मसात करावे. यासोबतच सांघिक भावना वृद्धिंगत करून देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. येथील गरूड झेप […]
नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने महाराष्ट्रातील […]
क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद – मंत्री छगन भुजबळ
नाशिक : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी […]
उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आनंदी आयुष्याची त्रिसूत्री – छगन भुजबळ
नाशिक : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन […]
समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य – मंत्री छगन भुजबळ
नाशिक : समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उपअभियंता रवींद्र पुरी, शाखा अभियंता तनुष चव्हाण, […]
‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मंत्री छगन भुजबळ
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी 57 लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह […]
नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात बँकेचा मोलाचा […]