मुंबई : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत […]
शेती
राज्यात झाल्या १०२ टक्के पेरण्या
मुंबई : राज्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास सरासरीच्या ८१.४ टक्के पाऊस झाला होता. १ जून ते २ सप्टेंबर पर्यंत १००२ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यात खरीपाचे १४२.०२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १४४.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर […]
मोठी बातमी : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा योजनेचा विस्तार
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत आहे. या मिशन मोडवरील या […]
कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
मुंबई : सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. २०२३ च्या खरीप […]
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मिळणार पाच हजार रुपये
मुंबई : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव […]
आनंदाची बातमी; केंद्र सरकारचा पहिला मोठा निर्णय, जूनमध्ये बँक खात्यात या तारखेला इतके पैसे जमा होणार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी PM-KISAN योजनेच्या १७व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी […]
शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!
मुंबई : एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे. मात्र, तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचं गांभीर्य नाही. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती बघता शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. […]
मुख्यमंत्र्यांची कबुली – लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका, कांदा, दूध, कापसाच्या दरांवरून रोष भोवला…
मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने १५ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. मात्र कांदा, दूध, कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत […]
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन
मुंबई, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच […]