3 Idiots actor Akhil Mishra passes away in an accident at the age of 58

लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले. स्वयंपाकघरात काम करत असताना ते घसरून पडल्याची माहिती मिळत आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती. सूत्राकडून मिळालेल्या माहितूनुसार, हा अपघात होता. अखिल मिश्रा किचनमध्ये जमिनीवर जखमी अवस्थेत सापडले, त्यानंतर रुग्णालयात […]

अधिक वाचा
actor Marimuthu passed away due to heart attack

अभिनेते जी मारीमुथू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते जी मारीमुथू यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 56 वर्षीय अभिनेता आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांनी अलीकडेच रजनीकांत स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट जेलरमध्ये काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जी मारीमुथू चेन्नईतील त्यांच्या टीव्ही सीरियल ‘इथर्नीचल’ साठी स्टुडिओमध्ये डब करत होते. अचानक सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना चेन्नईतील जवळच्या […]

अधिक वाचा
'Ekda Kaya Jala' won the National Film Award for Best Marathi

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

नवी दिल्ली : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला, तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला. येथील नॅशनल […]

अधिक वाचा
Veteran actress Seema Dev passed away

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी […]

अधिक वाचा

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची न्यायालयात धाव, ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटाचे प्रसारण थांबवण्याची मागणी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी OTT प्लॅफॉर्म्सवर चित्रपटाचे प्रसारण थांबवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने चित्रपटाच्या स्ट्रीमिंगवर स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्ण किशोर सिंह यांनी […]

अधिक वाचा
Art director Nitin Chandrakant Desai commits suicide at ND studio

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या

मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर […]

अधिक वाचा
Veteran actor Jayant Savarkar passed away

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांचे ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केले. जयंत सावरकर यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का […]

अधिक वाचा
Popular actor Atul Parchure suffering from cancer

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे कॅन्सरने ग्रस्त, यकृतामध्ये 5 सेमीची गाठ…

मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या विनोदांनी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अतुल कॅन्सरने ग्रस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. अतुल परचुरे यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आजाराशी संबंधित माहिती शेअर केली. अतुल यांनी सांगितले कि, माझ्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण […]

अधिक वाचा
Gashmeer Mahajani helped father overcome financial crisis debt

अभिनेता रवींद्र महाजनी झाले होते कर्जबाजारी, गश्मीरने अवघ्या १५ व्या वर्षी डान्स अकादमी सुरू करून फेडलं वडिलांवरचं कर्ज

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘हँडसम हिरो’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथे ते बंद खोलीत मृतावस्थेत आढळून आले. दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी दुपारी शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज […]

अधिक वाचा
Actor Ravindra Mahajani passed away

अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, पुण्यातील घरात आढळला मृतदेह

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत ७०-८०च्या दशकात हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहतेही धक्क्यात आहेत. शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू २-३ दिवस आधीच झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेते रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे इथल्या एका […]

अधिक वाचा