Modak Maharaj passed away in a terrible accident

मोडक महाराज यांचे भीषण अपघातात निधन, कारच्या काचेतून बाहेर फेकले गेल्याने जागीच मृत्यू

ठाणे : नवनीत्यानंद (मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात निधन झाले. कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्री. नवनित्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक (वय ५४) रा. कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष […]

अधिक वाचा
Non-cognizable offence registered against Rahul Gandhi for remarks against Savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे : भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना नेत्या वंदना डोंगरे यांनी तक्रार दाखल केली आहे. गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली. आयपीसी कलम 500, 501 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (एनसीआर) […]

अधिक वाचा
Flyover will be beneficial for heavy traffic - Chief Minister Eknath Shinde

अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन […]

अधिक वाचा
Amey khopkar

अमेय खोपकर यांची जीभ घसरली, राष्ट्रवादीवाले xxची औलाद, यांना लाजा नाही वाटतं?

ठाणे : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर […]

अधिक वाचा
Visit of Deputy Chief Minister Devendra Fadnavis to Shrimad Bhagwat Katha Gyan Yagya and Saint Sammel in Thane

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ठाणे : गीता ग्रंथातील ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व विराट संत संमेलनास […]

अधिक वाचा
Chief Minister approves creation of 79 posts in Disaster Response Team of Thane Municipal Corporation

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात 79 पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेस ही मान्यता दिली. ठाणे महानगरपालिकेने या संदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला […]

अधिक वाचा
burnt alive due to an argument

ठाण्यात खळबळ! घरगुती वादातून स्वतःची पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, आग लागल्याचा केला बनाव, मात्र…

ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या […]

अधिक वाचा
The body of a person who was swept away in the flood found four months later

ठाण्यातील तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

ठाणे : ठाणे शहरातील तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरडीएमसी प्रमुख अविनाश सावंत म्हणाले कि, सकाळी 10 च्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (आरडीएमसी) एक […]

अधिक वाचा
A 22-year-old youth died after being hit by a train at Mumbra railway station

मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची जोरदार धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना…

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील वडजाई गावचा रामेश्वर भरत देवरे (वय 22) हा तरूण सैन्य भरतीसाठी मुंबईत आला होता. या भरतीसाठी वडजाई आणि परिसरातून सुमारे 25 तरुण गेलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा
Inclusion of 14 villages in Thane taluka in Navi Mumbai Municipal Corporation

ठाणे तालुक्यातील ‘या’ 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

मुंबई : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, […]

अधिक वाचा