देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, माहिती लपवल्याच्या प्रकरणात न्यायालयाने केलं दोषमुक्त
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असता असे वाटत नाही, हे स्पष्ट करत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं. […]