बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील एका गावात 50 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही पाचवी इयत्तेत शिकत असून गावातीलच एका किराणा दुकानदाराने […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून त्या निफाड येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रंभाबाई काळे या निफाडमधील मामलेदार चौक परिसरात वास्तव्यास होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा […]
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध, तरुणीची पहाटेच पोलीस ठाण्यात धाव…
रायगड : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन १८ वर्षे ७ महिन्यांच्या तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार अलिबाग तालुक्यात समोर आला आहे. पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आरोपी नितेश पाटील उर्फ पप्प्या, रा. खंडाळे, याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी […]
पुण्यात खळबळ! सोशल मीडिया ट्रॅपचा वापर करून तरुणाची निर्घृण हत्या
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 17 वर्षीय अमन सिंगच्या क्रूर हत्येची घटना उघडकीस आली आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या अमनचा त्या दिवसानंतर काहीच मागमूस लागला नव्हता. कुटुंबीयांनी पोलिसांकडे अमन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना खेड-शिवापूरच्या दुर्गम भागात पुरलेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. वस्त्रांची जुळवाजुळव […]
पालघर हादरले! किरकोळ वादातून ऑफिसमधील सहकाऱ्याची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला…
पालघर : वसई औद्योगिक परिसरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. वैयक्तिक वादातून एका तरुणाने आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्याची हत्या करून मृतदेह कंपनीच्या आवारातील पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव २७ वर्षीय आसाराम राकेश असून मृताचे नाव […]
हिंजवडी आयटी पार्क हादरलं: भरधाव बस फुटपाथवर; बहीण–भावाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी […]
अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने केला तरुणाचा खून, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…
जालना : एका पत्नीने दिरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुमारे एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय परमेश्वर तायडे यांच्या मृत्यूचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी परमेश्वर तायडे यांचा भाऊ ध्यानेश्वर तायडे (28) आणि पत्नी मनीषा तायडे (25) आणि यांना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील सोमठाणा गावात हे […]
१० वर्षांच्या चिमुकलीवर वसतिगृह मालकाकडून महिनाभर बलात्कार, चौघांविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
राजस्थान : एका खाजगी वसतिगृह मालकाने १० वर्षांच्या चिमुकलीवर महिनाभर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृह मालकासह चौघांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडिता आपल्या धाकट्या भावासह शिक्षणासाठी या वसतिगृहात राहत होती. या काळात वसतिगृह मालक मुकेश गुर्जर हा रात्रीच्या वेळी […]
पुण्यात १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या, तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत […]
सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट! पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसह केली पतीची निर्घृण हत्या, आणि…
रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी केवळ २४ तासांत गुन्ह्याची उकल केली आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे आहे. त्याचा […]






