मुंबई : आज आयपीएल २०२५ मध्ये डबल हेडर आहे म्हणजेच एका दिवसात दोन सामने आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोईन अलीच्या जागी स्पेन्सर जॉन्सनला संधी देण्यात आली आहे. तर लखनौने गेल्या सामन्याच्या प्लेइंग-११ मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ४-४ सामने खेळले आहेत. दोघांनी २ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता आणि लखनौ यांच्यात ईडन गार्डन्सवर २ सामने झाले आहेत, त्यापैकी दोघांनी १-१ सामने जिंकले आहेत. येथे २०२४ मध्ये शेवटचा सामना केकेआरने जिंकला होता.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन आणि वैभव अरोरा.
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आवेश खान आणि आकाश दीप.




