सोलापूर : एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी वारंवार अत्याचार करून तिला शारिरिक आणि मानसिक त्रास दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारू, अशी धमकी देखील या नराधमांनी तिला दिली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून […]
सोलापूर
मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने […]
आरोग्याच्या सुविधा चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
सोलापूर दि.13(जिमाका): – सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केले. महिला व नवजात शिशू रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालय […]
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी
सोलापूर : दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झालेले असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीक आलेले नाही, हे सांगत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे थांबत नव्हते. दुष्काळी परिस्थितीची दाहकता व त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे […]
अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर : जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच टंचाईबाबत आढावा बैठक […]
शिक्षकाची पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या, सोलापूरच्या बार्शी शहरातील धक्कादायक घटना
सोलापूर : एका शिक्षकाने पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या बार्शी शहरात घडली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. अतुल मुंडे (वय 38) असे पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अतुल यांची पत्नी तृप्ती मुंडे (वय 37) देखील शिक्षिका होती. मिळालेल्या माहितीनुसार, […]
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]
जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा व्यवस्था चोखपणे ठेवावी, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते. […]
राज्यात लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविणार
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे. तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन […]
सोलापुर : नाश्ता बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघांचा होरपळून मृत्यू
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रुपम टेक्सटाइल्सच्या पहिल्या मजल्यावर काही वेळापूर्वी आग लागली होती. येथील कामगार नाश्ता बनवत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पहिल्या मजल्यावर कारखान्यातील काही सामान असल्याने आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. यावेळी दोनजण तात्काळ बाहेर आले, मात्र तीन कामगारांना बाहेर पडला आले नाही. त्यांच्या आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, आगीची […]