नांदेड : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. एक जण वाहून गेला तथापि, नांदेड […]
नांदेड
धक्कादायक घटना! ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला, राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामीच्या रागातून हल्ला
नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षाने केला आहे. राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामी केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कुणाल राठोड असं जखमी झालेल्या ठाकरे गटातील नगराध्यक्षाचं नाव आहे. कुणाल राठोड हे शिवसेना […]
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : वर्धा – ७.१८ टक्के अकोला – ७.१७ टक्के अमरावती -६.३४ टक्के बुलढाणा – ६.६१ टक्के […]
७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्मान
नांदेड, दि. 21 एप्रिल :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्वोकृष्ट कामगिरी व उत्कृष्ट मतदान टक्केवारी करणा-या गावांचा, वार्डचा त्याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्त सर्वस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्वोकृष्ट मतदान टक्केवारी असलेल्या तीन मतदान केंद्राचा […]
वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची – पालकमंत्री गिरीश महाजन
नांदेड : प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. सर्वांचा विकास हे अंतिम ध्येय बाळगुन आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला गॅस अशा कितीतरी लोककल्याणकारी योजनांनी सर्वसामान्यांना बळ दिले. आजही विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचितांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा […]
शेतरस्ते, पांदण रस्तेप्रश्नी तहसीलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी – राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड : कृषी क्षेत्राच्या विकासात लहान – मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्याची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश […]
नांदेड हादरलं! हसण्याच्या कारणावरुन फळ विक्रेत्याने छाटले तरुणाचे दोन्ही हात
नांदेड : हसण्याच्या कारणावरुन एका फळ विक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं पीडित तरुणाचं नाव असून मोहम्मद तोहीद हा आरोपी फरार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद […]
अचानक समोर शेळी आल्याने पिकअपचा भीषण अपघात, देवीचा नवस फेडण्यासाठी फेडण्यासाठी निघालेले 28 जण जखमी
नांदेड : किनवट तालुक्यातील शिवनी येथील पेट्रोल पंपाजवळ पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला. रविवारी हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील २8 जण तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. मात्र अचानक त्यांच्या पिकअपसमोर एक शेळी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप पलटी झाला. या भीषण अपघातात एकूण २८ जण जखमी झाले आहेत. यातील १९ […]
2 हजार मुलींना टाटा कंपनीत मिळाला रोजगार
नांदेड : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल २ हजार मुलींची टाटा सारख्या नामांकित कंपनीत निवड झाली. टाटा कंपनीतर्फे निवड झालेल्यांना 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, 3 लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. नुकतीच […]
ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे – विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी
नांदेड : कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे. […]