शिबलापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर – भाग्योदय नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्री. प्रमोद सतीश बोंद्रे यांची चेअरमन पदी तर श्री. सुभाष भागवत मुन्तोडे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांनी संस्थेच्या विकासासाठी स्पष्ट दिशा ठरवली आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्याची आणि सदस्यांना अधिकाधिक […]
अहिल्यानगर
Stay updated with the latest news and developments from अहिल्यानगर (Ahilyanagar) and the surrounding Malwa region. From local events and political updates to cultural stories and community happenings, this section brings you everything you need to know about life in this historic and vibrant region.
पानोड़ी ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, महिलांच्या संघर्षानंतर दारूबंदीचा ठराव मंजूर
पानोड़ी (ता. संगमनेर) : पानोड़ी गावातील महिलांनी दारूच्या दुष्परिणामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे गावातील मद्यविक्रीवर बंदी येणार आहे, आणि दारूच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गावात अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती, ज्यामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत होते. घरातील पुरुष मद्याच्या आहारी […]
जोर्वे ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर वादळी चर्चा, ग्रामस्थांनी जोर्वेतच कार्यालयाची मागणी केली
संगमनेर, ३ मार्च: संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थळी वादंग निर्माण झाला. आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला जोर्वे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत, हे कार्यालय जोर्वेतच व्हावे अशी ठाम मागणी केली. ग्रामसभेत काही सदस्यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेस विरोध करत ठराव मांडला, मात्र बहुतांश ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत अप्पर तहसील […]
शिर्डीत ‘नक्शा’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू; शहरी भूअभिलेख डिजिटायझेशनसाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल
शिर्डी : केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहराच्या हद्दीतील संपूर्ण भूभागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे “नक्शा” […]
महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचांना केली मारहाण
महाराष्ट्र केसरी 2025: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ […]
मुद्दाम धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवले जात आहे, भगवानगड त्यांच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण
नगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा काही दिवस फरार होता. त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसर्मपण केले. दरम्यान, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या […]
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी – शिर्डी साई मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला परवानगी
शिर्डी – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे फुले विक्रीसाठी लढा दिला होता, आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. फुलशेती हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. परंतु, साई मंदिरात फुले आणि हार विक्रीवर घालण्यात […]
सात वर्षांपासून फरार आरोपीचा पाठलाग: अंधारात पोलीस व आरोपी विहिरीत पडले
संगमनेर तालुक्यातील सांगवी गावात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेत सात वर्षांपासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी व त्याचा पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी अंधारामुळे विहिरीत पडले. घटनेचे सविस्तर वृत्त: २०१६ साली जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणात आरोपीने आपल्या मामा आणि मामीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने आरोपी […]
कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी, लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशी दिली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलनं झाली होती. अखेर न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता या घटनेला आठ […]
…अन्यथा बाळासाहेब थोरातांच ‘ते’ स्वप्न आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं – राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं […]