WhatsApp ने युझर्ससाठी आणलं जबरदस्त फिचर, व्हिडीओ कॉलिंगदरम्यानही करू शकणार मल्टीटास्किंग, जाणून घ्या…
नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp युझर्ससाठी सतत नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट्स आणत असतात. आता व्हॉट्सऍपने व्हिडिओ कॉलिंगदरम्यान मल्टीटास्किंग सक्षम करण्यासाठी पिक्चर-इन-पिक्चर मोड आणला आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलिंगदरम्यान इतर ऍप्सचाही वापर करता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने बीटा चाचणीसाठी कॉन्टॅक्ट कार्ड शेअर फीचर जारी केले आहे. […]