अहिल्यानगर कोल्हापूर महाराष्ट्र

ऊस संशोधनात नवे पाऊल : विखे पाटील फाउंडेशन व डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये सामंजस्य करार

अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, अहिल्यानगर आणि डी. वाय. पाटील कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे (कोल्हापूर) यांच्यात आधुनिक ऊस रोपे उत्पादन व कृषि संशोधन केंद्र स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार बुधवारी (३० जुलै) अहिल्यानगर येथे झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या करारानुसार, दोन्ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व शिबिरे यांच्या माध्यमातून ऊस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करतील. तसेच गुणवत्तापूर्ण ऊस रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे शाश्वत ऊस शेतीला चालना मिळेल, असा विश्वास संस्थांनी व्यक्त केला.

सामंजस्य करारावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन आणि विखे पाटील फाउंडेशनचे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील, अहिल्यानगर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा. डॉ. हरीभाऊ शिरसाठ व प्रा. डॉ. सूरज खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

हे संशोधन केंद्र ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यार्थ्यांसह साखर उद्योगाशी संबंधित संशोधक व तज्ज्ञांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत