Shegaon and Shirdi Food Street Hub approved by Central Government
महाराष्ट्र मुंबई

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे फुड स्ट्रीट हबला केंद्र सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दोन्हीही धार्मिक स्थळी प्रत्येकी १ कोटी या प्रमाणे २ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फुड स्ट्रीट हब सेंटर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा देशांतर्गत १०० ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रस्त्यावरील खाद्यपदार्थामुळे होणारे आजार, अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी अन्न हाताळणीची सुरक्षित मानके देशभर लागू करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या वतीने देशभरात १०० फुड स्ट्रीट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगांव येथे १ कोटी रुपये खर्चून आधुनिक स्वच्छ आणि “आरोग्यदायी” स्वच्छ फुड स्ट्रीट विकसित केल्या जाणार आहे. असेच फुड स्ट्रीट हब साई बाबांच्या शिर्डीतही उभारल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील दोन्ही धार्मिक स्थळांवर हे फुड स्ट्रीट हब विकसित करण्याला मान्यता दिली आहे.

त्यामुळे विदर्भाच्या पंढरीत येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना तसेच साईबाबांच्या भक्तांना शिर्डीत दर्जेदार आणि पौष्टीक अन्न सेवा या हबच्या माध्यमातून मिळणार आहे. शिवाय लघु व्यावसायिक विक्रेत्यांना रोजगाराची चालना मिळणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील शेगांव आणि शिर्डी येथे फुड स्ट्रीट हब मंजुर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत