पुणे महाराष्ट्र राजकारण

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ चिन्हाच्या परिवर्तन आणि सुशासन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. पॅनेलचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. सर्वसाधारण, महिला राखीव, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती या सर्व प्रवर्गांत ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सर्वसाधारण मतदारसंघातून अतुल यादव, अमोल सावंत, गिरीश रंगे, निरंजन माळवदकर, नीरज दोन्हे, प्रवीण कुमकर, शरद शिंदे, श्रीकांत राजोबा, समीर भोकरे आणि सुरेश पिसाळ हे विजयी झाले.

महिला राखीव मतदारसंघातून किरण आगलावे आणि प्राजक्ता तट्टू यांनी विजय मिळवला. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून रोहन राऊत, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुनील सांगळीकर, तर विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून दत्तात्रय पडार विजयी झाले.

या निकालामुळे ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलने सर्व १५ जागांवर विजय मिळवत सोसायटीच्या संचालक मंडळात बहुमत मिळवले आहे. सभासदांनी दिलेला स्पष्ट कौल हा या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

विजयानंतर पॅनेलच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल विजयी उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त केली. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत सोसायटीचा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख कारभार करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी भूमिका पॅनेलच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

सोसायटीतील विकासकामे, सभासदांच्या समस्या, देखभाल-दुरुस्तीची कामे, आर्थिक पारदर्शकता तसेच सर्व सभासदांना विश्वासात घेऊन निर्णयप्रक्रिया राबविण्यावर भर देण्याचा निर्धार विजयी पॅनेलने व्यक्त केला.

निवडणूक अधिकारी संतोष तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शैलेश चव्हाण आणि त्यांच्या पोलीस पथकाच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

विजयानंतर ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलने विजयाचा उत्सवही आगळ्या पद्धतीने साजरा केला. कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता, मोठे ध्वनिक्षेपक न लावता किंवा गुलालाची उधळण न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ज्येष्ठांच्या हस्ते गणपतीची आरती करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या माध्यमातून संस्कार, शिस्त आणि सुसंस्कृतपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘उघडलेले पुस्तक’ हे केवळ ज्ञानाचे प्रतीक नसून विचार, सुसंस्कृतपणा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे प्रतीक आहे, याचा प्रत्यय या विजयोत्सवातून आला.

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा सर्व १५ जागांवरील विजय हा पारी टॉवर्सच्या सभासदांनी विकास, पारदर्शकता आणि विश्वासाला दिलेला स्पष्ट कौल मानला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत