Faf du Plessis Taken to Hospital After Horrific Collision with Mohammad Hasnain While Fielding

फाफ डू प्लेसिस सामन्यादरम्यान जखमी, सहकारी हसनेनशी जोरदार धडक, रुग्णालयात दाखल..

अबू धाबी : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर फाफ डू प्लेसिस शनिवारी अबू धाबी येथे PSL 6 सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. डू प्लेसिसची सहकारी मोहम्मद हसनेन याच्याशी जोरदार टक्कर झाली. त्यामुळे फाफ डू प्लेसिसला चांगलाच मार बसला. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात सातव्या षटकात ही घटना घडली. फाफ डू प्लेसिसने चौकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, यावेळी दुसऱ्या बाजूने […]

अधिक वाचा
Christian Eriksen Collapsed During Denmark Vs Finland Match

फुटबॉलपटू एरिक्सन सामन्यादरम्यान मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला, रुग्णालयात दाखल

कोपनहेगन : युरो कप २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डेन्मार्क वि. फिनलंड या दोन संघांमध्ये मॅच सुरू होती. या मॅचदरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. पहिल्या हाफमधील खेळ संपन्याच्या अगोदर ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, एरिक्सनची प्रकृती सध्या स्थिर आहे. एरिक्सन बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा दिली गेली. त्याला मैदानावरच […]

अधिक वाचा
Bangladesh star cricketer Shakib Al Hasan punished for behavior

बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला गैरवर्तनाची शिक्षा, पुढील चार सामन्यांसाठी बंदी

नवी दिल्ली : बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल व पंचांशी भांडण केल्याबद्दल शिक्षा झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्याच्यावर ढाका प्रीमियर लीगच्या पुढील चार सामन्यांसाठी बंदी घातली होती. यासंदर्भात मंडळाने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही. मोहम्मदान स्पोर्टिंग क्लब क्रिकेट समितीचे अध्यक्ष मसूदुझमान यांनी शनिवारी क्रिकबझला सांगितले की, “आम्हाला अद्याप कोणतेही अधिकृत […]

अधिक वाचा
Asian Games gold-winning boxer Dingko Singh

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे माजी बॉक्सर डिंगको सिंह यांचे निधन

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे माजी बॉक्सर डिंगको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांना यकृताचा कर्करोग झाला होता आणि 2017 पासून ते या आजाराशी झुंज देत होते. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. क्रीडामंत्री किरेन रिजिजू ट्विट करत म्हणाले कि, “श्री. डिंगको सिंह यांच्या निधनामुळे मला अतिशय वाईट वाटते. […]

अधिक वाचा
The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची […]

अधिक वाचा
Bhuvneshwar Kumar And His Wife in Quarantine After COVID-19 Symptoms

भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी विलगीकरणात, भुवनेश्वरच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु

मेरठ : भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते दोघेही विलगीकरणात राहत आहेत. मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. तथापि, 21 मे रोजी भुवनेश्वरच्या आईचा […]

अधिक वाचा
bcci decides on 14th season of ipl suspended after many players and staff got infected

IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS 🚨 […]

अधिक वाचा
olympian wrestler sushil kumar arrested by delhi police in sagar rana murder case chhatrasal stadium

ब्रेकिंग : छत्रसाल स्टेडियम हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारला अटक

दिल्ली : छत्रसाल स्टेडियममधील ज्युनियर सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी मुंडका परिसरातूनच अटक केली आहे. सुशीलसह त्याचा साथीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा […]

अधिक वाचा
Cricketer Bhuvneshwar Kumar's Father Dies In Meerut

ब्रेकिंग : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन

मीरत (उत्तर प्रदेश) : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग हे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्व प्रकारचे इलाज करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुटुंबीयांनी त्यांना गंगानगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणले होते. तिथेच त्यांनी […]

अधिक वाचा
legendary runner Milkha Singh infected with corona

महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

चंदिगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या चंदिगडमध्ये त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिल्खा सिंग यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला ताप आला होता. त्यामुळे बुधवारी तात्काळ मिल्खा सिंग यांनी कोरोना […]

अधिक वाचा