पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील सातववाडी पीएमपी बस थांब्यासमोर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. डॉ. ईश्वर साहू (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, डॉ. साहू हे त्यांच्या दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात असताना, एका थांबलेल्या पीएमपी बसच्या […]
पुणे
पुण्यातील 51 शाळा बोगस असल्याचा मोठा खुलासा, पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 51 अनधिकृत शाळा बोगस असल्याचे उघड झाले आहे. अलिकडच्या मूल्यांकनानंतर राज्यभरातील सुमारे 1300 संशयित शाळांची छाननी करण्यात आली. त्यात 800 हून अधिक शाळांमध्ये कागदपत्रांत त्रुटी आढळल्या, तर यापैकी 100 शाळा आधीच कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, […]
खंडाळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, अनेक जण जखमी
पुणे : खंडाळा जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (२० एप्रिल) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक – GJ 03 BT 6701) मागून इनोव्हा कारला (MH 19 BG 8067) जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी होती की […]
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, नंतर पोलीस ठाण्यात पतीची आत्महत्या
पुणे : तळवडे येथील शरद रूपचंद चितळे (वय ३५) नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला गळा दाबून मारले. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून त्याला वाचवले. मात्र, त्यानंतर चौकशीसाठी चिखली पोलिस ठाण्यात बोलावले असता तेथेच त्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, चितळे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्याची पत्नी […]
पुणे : अल्पवयीन मुलाकडून रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात, १९ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांना ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ प्रदान
पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ यंदा कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या खास विनोदी आणि सडेतोड शैलीतून समाजप्रबोधन, लोकशिक्षण […]
हृदयद्रावक! जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आईचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
पुणे : आईच्या घरी आलेल्या एका विवाहित महिलेने तिच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून नंतर स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी साडेसहाच्या सुमारास हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (३५) असे या […]
पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार
पुणे : पुण्यात लैंगिक अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूतानमधील एका २७ वर्षीय तरुणीवर सात पुरूषांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही तरुणी २०२० मध्ये कामाच्या शोधात भारतात बोधगया येथे आली. त्यानंतर ती पुण्यात राहायला आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख आरोपींपैकी एक असलेल्या ऋषिकेश नवलेशी झाली होती, ज्याने तिची ओळख त्याचा मित्र […]
पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील माळवाडी, गोकुळ नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्फोटात लागलेली आग विझवण्याचे […]
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फटकारले
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या एका अत्यंत वेदनादायक घटनेत, भाजप आमदार अमित गोराखे यांचे सहकारी सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त झाला आहे आणि वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी शोकाकुल भिसे […]