इंडोनेशियामध्ये आता विवाहपूर्व लैंगिक संबंधांवर बंदी, नवा कायदा मंजूर
इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या संसदेने विवाहापूर्वी लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच आता इंडोनेशियामध्ये लग्नाआधी कोणाशी शारीरिक संबंध ठेवणे बेकायदेशीर आणि गुन्हा मानला जाईल. या नव्या कायद्यानुसार केवळ पती-पत्नीच शारीरिक संबंध ठेवू शकतात. दुसरीकडे, एखाद्या विवाहित जोडप्याने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले तर ते देखील गुन्ह्याच्या कक्षेत येईल. कारवाई कधी होणार? […]