Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पूरग्रस्तांना आश्वासन, काय आहेत पूरग्रस्तांच्या मागण्या, जाणून घ्या..

सांगली : राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. […]

अधिक वाचा
Maharashtra Will Be Unlocked In Five Levels Order Issued

सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सातारा : सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. […]

अधिक वाचा
mahabaleshwar pachgani starting from tomorrow for tourists read the rules

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु करण्याचा निर्णय, ‘असे’ असतील नियम

सातारा : पर्यटकांसाठी राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी आजपासून (१९ जून) सुरु होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली जाईल. तर हॉटेल व्यावसायिक, कर्मचारी यांना प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. […]

अधिक वाचा
The Car Stuck Into A Tree While Crashing Into A 400 Feet Deep Ravine

घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार संरक्षक कठड्यावरुन खाली गेली, पण…

सातारा : वाईहून पाचगणीला जाणाऱ्या कारला पसरणी घाटात अपघात झाला. परंतु, यावेळी मोठा अनर्थ टळला. घाटातील वळण चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कार रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन खाली गेली. परंतु, काही फूट अंतरावर गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही कार तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. या कारसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या […]

अधिक वाचा