तेलंगणा : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मुलाचा रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघात झाला आहे. ही घटना तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील काझीपेट रेल्वे स्थानकाजवळची आहे. या अपघातात अक्षय राज नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा मुलगा समोरून […]
ट्रेडिंग
Video : दोन हेलिकॉप्टर धडकल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चॉपरचे पंखे एकमेकांना भिडले आणि…
Helicopter Accident Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकताना दिसत आहेत. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान झाले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात एका हेलिकॉप्टरने लॅन्ड करताना तेथेच थांबलेल्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला धक्का दिला आणि दोन्ही हेलिकॉप्टरचा चुराडा झाला. सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडिओ व्हायरल […]
Video : पिल्लू मॅनहोलमध्ये पडल्यानंतर तणावामुळे हत्तीणी झाली बेशुद्ध, रेस्क्यू अधिकाऱ्यांनी तिला CPR दिला आणि…
थायलंड : थायलंडमध्ये एक विलक्षण घटना समोर आली आहे. एका आई हत्तीणीचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते मदतीसाठी मोठ्याने ओरडत होते. या सर्व तणावामुळे आई हत्तीणी बेशुद्ध झाली, त्यानंतर पशुवैद्यकीय आणि राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी तिला सीपीआर दिला. वास्तविक, तिचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते आणि कर्मचारी या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याची आई उन्मादात खाली […]
Video : रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे ट्रॅकवर उडी मारत वाचवला एका व्यक्तीचा जीव, रेल्वे मंत्रालयाने केले कौतुक
पश्चिम बंगाल : रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या एका कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचा जीव वाचवल्याचं दिसत आहे. भारतीय रेल्वेने एच. सतीश कुमार यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यासारखे धाडसी आणि मेहनती कर्मचारी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीवर, पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील बालीचक रेल्वे स्थानकावरील 24-सेकंदाच्या CCTV फुटेजमध्ये, रेल्वे […]
थरकाप उडवणारा Video! सिंहासोबत मस्ती करणे पडले महागात, बोटाची हाडंच फक्त शिल्लक राहिली आणि…
इंटरनेटवर जमैका प्राणीसंग्रहालयातील एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिंहासोबत मस्ती करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. यात एका माणसाने सिंहाच्या पिंजऱ्याच्या आत आपला हात घातला आणि त्यानंतर सिंहाने त्याचे बोट चावून तोडून टाकले. विशेष म्हणजे, हे सगळं घडत असताना अनेकजण तिथेच उभे राहून या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जमैका प्राणीसंग्रहालयातील प्राणिसंग्रहालयाचा […]
‘रानबाजार’ मध्ये अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज… तेजस्विनी विवस्त्र तर प्राजक्ताचा प्रणय करतानाचा सीन.. पहा व्हिडिओ
मुंबई : इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन गोष्ट नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं नाव आह रानबाजार. रानबाजारचे दोन टिझर नुकतेच शेअर करण्यात आले. वेबविश्वाला […]
अक्षय्य तृतीयेला सोन्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी
पुणे : अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते आणि दिवाळी, धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या प्रसंगी तर ते आवर्जून खरेदी करतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी आहे आणि बरेच लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील. वास्तविक, अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या प्रसंगी सोने खरेदी करणे सौभाग्य आणि समृद्धीशी संबंधित […]
Google चे नवीन फिचर! आता तुम्ही Google वरून हटवू शकता तुमची वैयक्तिक माहिती…
पुणे : गुगलवर तुमचे वैयक्तिक तपशील दिसल्याने तुम्ही जर अस्वस्थ असाल, तर आता तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही Google कडे तक्रार देखील करू शकता आणि तुमचे वैयक्तिक तपशील हटवू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी एक पॉलिसी आणली आहे. गुगलच्या पॉलिसी हेडने याबाबत माहिती दिली. गुगलच्या पॉलिसी हेड मिशेल चांग यांनी याबाबत सविस्तर माहिती […]
एलन मस्क यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवणं पडेल महागात, कारण…
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता एलन मस्क यांनी असे केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा अंदाज एका […]
पुष्पा फिव्हर! आता चिंपांझीने केली श्रीवल्ली स्टेप्सची कॉपी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याचा ‘फिव्हर’ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेला नाही. अल्लू अर्जुनची स्टाइल आणि स्टेप्स कॉपी केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयात बंद असलेला एक चिंपांझी ‘श्रीवल्ली स्टेप्स’ची कॉपी करत असल्यासारखे चालतो आहे. एका […]