जालना, दि. १२ (जिमाका): नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. जालना जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यातील उत्पादीत शेतीमाल व इतर वस्तुंच्या निर्यातीसाठी […]
इतर
राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; शाळांचे मूल्यांकन करणार, पहिल्या टप्प्यात 478 शाळा
मुंबई : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व […]
पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळविण्याची मुदत ९६ तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत […]
सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळेत देण्यासाठी उपाययोजना करणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई : जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली अंमलात आणली जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदांना निधी वाटप, जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतन देयके कोषागारात सादर […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कबुलायतदार गावकर पद्धतीत महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ मधील नियम क्र.५२ मधील तरतूद शिथील करण्यात आली […]
मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, […]
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे
पुणे : पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली. पुणे विभागातील पुणे, […]
नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या […]
एसटीचे विलनीकरण नाहीच?; राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा महत्त्वाचा अहवाल सादर..
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे […]