Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई सोलापूर

मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता, 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील 35 तालुक्यातील 11 गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेस लवकरच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात येतील. सदस्य समाधान आवताडे याबाबतच्या चर्चेत सहभागी झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत