मुंबई : राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. […]
टॅग: narendra modi
गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने […]
अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी – विश्वास कुमार रमेश यांनी सांगितला थरारक अनुभव…
अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात सर्वत्र मृत्यूचे तांडव घडत असताना एकमेव प्रवासी जीवंत बचावले — विश्वास कुमार रमेश! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विश्वास यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विश्वास कुमार रमेश हे एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या फ्लाईट AI171 मध्ये प्रवास करत होते. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या […]
देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]
शशि थरूर यांचा काँग्रेसला थेट इशारा: काँग्रेसमध्ये आजवरच्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता?
काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची खुलेआम प्रशंसा केल्यानंतर पक्षाच्या गोटात गदारोळ उडाला आहे. त्यावर आता काँग्रेसने थरूर यांच्यावर टीका सुरू केली आहे. थरूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेतला होता, आणि आता त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थरूर […]
शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्नशील, काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घ्या…
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सहकार से समृद्धी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण सहकाराच्या समृद्धीवर चर्चा करत आहोत. गावांच्या स्वावलंबनासाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे. त्यात स्वावलंबी भारताची ऊर्जा आहे. स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी गावे स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पूज्य बापू आणि सरदार पटेल यांनी […]
महत्वाची बातमी : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू, या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा, प्रियजनांची माहिती मिळवा…
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. ह्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत 2 महिलांसह 12 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences […]
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, बँक बुडाली तरी सुरक्षित राहतील तुमचे पैसे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी सांगितले की, ज्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत अशा ठेवीदारांना एकूण 1300 कोटी रुपये दिले गेले आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या समस्येवर आज […]
‘त्या’ एका फोननंतर हटवण्यात आलं पुण्यातील मोदी मंदिर
पुणे : पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्यानंतर पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका समर्थकाने औंध परिसरात मोदी मंदिराची उभारणी केली होती. पण आता पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात पंतप्रधान नरेंद्र […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीकरण मोहीमेचा आढावा, लसीच्या अपव्ययाबाबत चिंता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लसीच्या अपव्ययाबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी लस उत्पादनासाठी कंपन्यांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या […]










