आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करायला अमरावती जिल्ह्यात येत आहेत. शिवणी रसूलापूर गावाजवळ ते महामार्गाची पाहणी करणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता ते नागपूरातून हेलिकॉप्टर ने शिवणी रसुलापूरला पोहोचणार आहेत. त्यानंतर ते महामार्गाची पाहणी करणार आहेत.
701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे एकूण 16 सेक्शन आहेत. मुख्यमंत्री क्रमांक 3 च्या सेक्शन ची पाहणी करणार आहेत. 73 किमी लांबीच्या या सेक्शन मध्ये पुलांचे काम वगळून महामार्गाचे बहुतांशी बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलांचे बांधकाम अजून सुरू आहे.