शिबलापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर – भाग्योदय नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्री. प्रमोद सतीश बोंद्रे यांची चेअरमन पदी तर श्री. सुभाष भागवत मुन्तोडे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांनी संस्थेच्या विकासासाठी स्पष्ट दिशा ठरवली आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्याची आणि सदस्यांना अधिकाधिक सुविधा व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. ही निवड संस्थेच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असं मानलं जात आहे. निवडणुकीनंतर संस्थेच्या सदस्यांनी नवनिर्वाचित नेतृत्वाचे स्वागत करून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विकासाची आशा व्यक्त केली आहे.
