Nagpur Violence Case Update Treason Case Filed On Fahim Khan And 50 Others, Police block Social Media posts
नागपूर महाराष्ट्र

नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे…

नागपूर : नागपूर दंगलीच्या प्रकरणात मुख्य आरोपी फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणात ५० हून अधिक आरोपींवर कडक कारवाई करत गंभीर कलमं लावली आहेत. नागपूर दंगल प्रकरणी पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या. नागपूरमधील वातावरण बिघडवण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, काही व्हिडिओ आणि मेसेज परदेशी आयपी अ‍ॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी चौकशी केली असता यामागे मास्टरमाइंड म्हणून फहीम खान याचे नाव समोर आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाच्या कबरीचे दहन केले होते. त्यानंतर, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांनी काही युवकांनी ‘आयत’ असलेली चादर जाळल्याचे सांगितले आणि ते धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले. यानंतर, फहीम खान यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चादर जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांना आश्वासन देऊन परत पाठवले. मात्र, त्यानंतर गांधीगेट परिसरात फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली काही युवक घोषणाबाजी करत जात असताना वाद निर्माण झाला आणि दंगल उसळली.

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना मोठी शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या आणि देशविघातक कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही आरोपींविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांनी सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरवात केली असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सायबर पोलिसांनी देखील या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपींचे मोबाईल आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, काही व्हिडिओ आणि मेसेज बांगलादेशमधून व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली महत्वाची माहिती:

दरम्यान याप्रकरणी पोलिसांची नुकतीच पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सायबर विभागाचे डीसीपी लोहित मतांनी यांनी महत्वाची माहिती दिली. या राड्यातील आरोपी नागपूरचे नसल्याचा महत्वाचा खुलासा त्यांनी केला. सर्व तपास सुरू असून घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये, तेढ वाढू नये यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याचं काम सुरू आहे, असंही मतांनी यांनी नमूद केलं. नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले होते.

फहीम खान याच्या सोशल मीडियावर बरेच वादग्रस्त कंटेट सापडला आहे. बांगलादेश आणि इतर काही ठिकाणांहून पेजेस चालवल्याचा आरोप आहे, त्याबद्दल पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला. सर्व फेसबुक पेजेस ब्लॉक केले. 17 ते 19 तारखेपर्यंतचे सर्व पेजेस ब्लॉक करण्यासाठी आम्ही संबंधित एजन्सीला पाठवले आहेत. त्यामध्ये 50 टक्के पोस्ट ब्लॉकही झाल्या आहेत. फहीम खान याच्यावर आधीचेही गुन्हे आहेत.

पोलिसांच्या विरोधात जी दगडफेक झाली त्याचं ग्लोरिफिकेशन केलं गेलं, त्यासोबत काही कमेंट आणि कॅप्शन टाकलं आहे. अल्ला हू अकबर आणि सर तन से जुदा असे कॅप्शन होतं. हिंसा भडकवण्यासाठी आणि तिचं उदात्तीकरण करण्यासाठी हे केलं गेलं. असं करणाऱ्या लोकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30/25 कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खान सहीत सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अजून काही जण त्यात ॲड होतील, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितलं कि, बांगलादेशचं कनेक्शन होतं की नाही याचा तपास करत आहोत. केवळ प्रोफाईलवर बांगलादेश लिहिलं म्हणून त्यावर कमेंट करू शकत नाही. १५२ सेक्शन आम्ही लावलं आहे. पण आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे की नाही यावर बोलणार नाही. काल रात्री एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरचा तपास होईल. त्यानंतर सर्व माहिती कळेल. चार एफआयआर दाखल केले आहे. 50 हून अधिक आरोपी आहेत. अधिक आरोपी ॲड होतील.फंडिंग झालं की नाही हे दिसलं नाही. एनआयमार्फत चौकशी करायची की नाही त्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. एसआयटीचा निर्णय राज्य सरकार घेईल.

ज्यांनी औरंगजेबचा जुना व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. ज्यांनी हिंसेचा व्हिडीओ व्हायरल करून आणखी हिंसा भडकवण्याची अपील केली त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. फहीम खान मास्टरमाइंड आहे की नाही हे सांगता येत नाही. पण मास्टरमाइंडपैकी एक म्हणू शकतो, अजून तपास सुरू आहे. फहीम खानच्या फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट मिळाल्या आहेत. हिंसा भडकणवारे पोस्ट मिळाले आहेत. या पोस्टमुळे घटना घडली आहे. ही हिंसा वाढली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत