अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळात केला आहे. विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील कारवाई बाबत चुकीची व दिशाभूल करणारी […]
टॅग: sangamner
भाग्योदय नागरी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदांची बिनविरोध निवड
शिबलापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर – भाग्योदय नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्री. प्रमोद सतीश बोंद्रे यांची चेअरमन पदी तर श्री. सुभाष भागवत मुन्तोडे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांनी संस्थेच्या विकासासाठी स्पष्ट दिशा ठरवली आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्याची आणि सदस्यांना अधिकाधिक […]
नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरु
अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना […]
दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण : हंगेवाडीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. १९ सप्टेंबर २०२२ रोजी गणपतीपुळे येथे १२.३० वाजता उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र […]
संगमनेर : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
संगमनेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात […]
इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, कोर्टात अंनिसचा वकीलही युक्तिवाद करणार
अहमदनगर : लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याविरोधात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. ऐच्छिक संतती प्राप्तीसाठी […]
अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मीने उभारली सुंदर बाग, सयाजी शिंदे यांनी दिली भेट
मराठी चित्रपटांसह मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या मूळच्या संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावच्या रहिवासी. कोरोनाच्या काळात मागील चार महिन्यांपासून त्या आपल्या गावी आहेत. या काळात वेळेचा सदुपयोग म्हणून त्यांनी आपल्या गावात त्यांच्या आजीच्या नावे अतिशय सुंदर बाग निर्माण केली. नित्यश्री यांनी नुकताच आपला वाढदिवस आजीच्या नावे बाग उभारून साजरा केला. यावेळी त्यांनी आपल्या लहान भावंडांच्या […]







