proposal to upgrade rural hospitals to sub-district hospitals

संगमनेर : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

महाराष्ट्र

संगमनेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात रुपांतर करणे याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार सुधीर तांबे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गर्दी बघता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तातडीने होणे आवश्यक आहे. संगमनेर तालुक्याचा होत असलेला विस्तार आणि येथील लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढीबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत