Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात जाणार, डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप

ग्लोबल

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक होत चालली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीची लढत सुरु आहे. अशातच आता मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “आपण दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्यात हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही” असंदेखील ट्रम्प म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत