samsung galaxy a21 catches fire in plane

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात लागली आग, इमर्जन्सी स्लाईड्सद्वारे प्रवाशांना उतरवलं…

गॅझेट्स ग्लोबल

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. विमानतळावर विमान उतरत असताना ही आग लागली. या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याच्या स्लाइडद्वारे (emergency slides) सर्वांना बाहेर काढले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलास्का एअरलाइन्सच्या विमानात घडली. हे विमान सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यादरम्यान, हा स्मार्टफोन जास्त गरम झाल्यामुळे स्पार्क व्हायला लागला. गॅलेक्सी ए 21 मध्ये लागलेल्या आगीमुळे कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. दोन जणांना किरकोळ इजा झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सीएनईटीच्या अहवालानुसार, सॅमसंगच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की त्यांना या प्रकरणाची माहिती आहे आणि ते याबाबत सखोल चौकशी करत आहेत. गॅलेक्सी ए 21 हा सॅमसंगच्या मिड-रेंज स्मार्टफोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन लोकप्रिय देखील आहे आणि यात 4,000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. ही समस्या नक्की बॅटरीमध्ये झाली आहे की फोनमध्ये हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत