अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादन योजनेवरून मोठे वक्तव्य केले आहे. दोहा येथून बोलताना ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कूक यांना थेट सल्ला दिला की, “भारतात कारखाना सुरू करू नका, अमेरिकेतच गुंतवणूक करा.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. ट्रम्प म्हणाले, […]
टॅग: donald trump
डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक खाते दोन वर्षांसाठी निलंबित
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकने मोठा झटका दिला आहे. फेसबुकने शुक्रवारी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट 2 वर्षांसाठी निलंबित केले. यासोबतच भविष्यात नियम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार केला जाईल, याचीही घोषणा केली आहे. फेसबुकच्या स्वतंत्र निरीक्षण मंडळाने मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील सोशल मीडिया जायंटचे निलंबन कायम ठेवले आहे, जे अमेरिकन संसदेवर 6 जानेवारी […]
…तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे- डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, इलेक्टोरल कॉलेजनी जो […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]
डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्रपतीपद तर गेलंच, आता मेलेनिया ट्रम्प घेणार घटस्फोट
अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची निवड झाली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार आहे. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलेनिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेली […]
US Election : जो बायडन बहुमताच्या जवळ, मतगणनेविरोधात डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात […]
डोनाल्ड ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात जाणार, डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक होत चालली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीची लढत सुरु आहे. अशातच आता मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा […]
भारतासारखे देश जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत, डोनाल्ड ट्रम्प यांची टीका
डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात शेवटची अध्यक्षीय डिबेट आज पार पडली. या डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर चांगले उपाय अवलंबले आहेत. चीन, […]
ट्रम्प करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळायला हवी- जो बायडेन
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले असले तरी ते करोनामुक्त झाल्याचं अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तसेच, ट्रम्प अद्याप करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे, असं मत जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. मंगळवारी बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “अनेक जण करोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या […]
करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ..
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प हेलिकॉप्टरमधून वॉल्टर रिड लष्कर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. याआधी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला. […]