Donald Trump finally conceded defeat

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

ग्लोबल

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की प्रक्रियानुसार जे काही करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे. त्यानंतर जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुखांनी जो बायडन यांना पत्र लिहून त्यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे. विश्लेषकांच्या मते, सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला मान्यता देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे आपला पराभव मान्य करण्याचे संकेत दिले आहेत.

या सत्ता हस्तांतरणांमुळे आता निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या टीमला व्हाईट हाऊसमधील अनेक महत्वाच्या गोष्टींचा अधिकार प्राप्त होणार आहे. निर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी या अगोदरच संरक्षणासंबंधीच्या नियमित बैठकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत