अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची निवड झाली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार आहे. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलेनिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे.
स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेली मेलनं हे वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांचा घटस्फोट होणार आहे. असे सांगितले जात आहे की, व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही आहे. मात्र सुत्रांनी शक्यता वर्तवली आहे की व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. शनिवारी ट्रम्प गोल्फ खेळण्यात व्यस्त होते. ट्रम्प गोल्फ खेळण्यासाठी गेले असतानाही त्यांच्यासोबत मेलेनिया नव्हत्या.