A 20-year-old man raped a married woman

विवाहित महिलेवर २० वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवत केला बलात्कार

पुणे

पुणे : ३० वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव पठार परिसरात समोर आला आहे. आरोपीने महिलेला लग्नासाठी जबरदस्ती केली तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्कार व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका रुग्णालयात आया म्हणून काम करते. कामावरून घरी जाताना एका महिलेने फोन करण्यासाठी त्यांचा मोबाइल घेतला होता. त्यानंतर काही वेळातच आरोपीने महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज केला. मात्र, महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही. आरोपी वारंवार त्यांना मेसेज करत होता. शेवटी महिलेने आरोपीला समजावून सांगून त्याचा नंबर ‘ब्लॉक’ केला.

काही दिवसांनंतर परत आरोपी महिलेला फोन करू लागला. एके दिवशी महिला कामावरून घरी जात असताना आरोपीने त्यांना भारती हॉस्पिटलसमोर अडवले. यानंतर त्यांच्या गळ्याला चाकू लावून नवले ब्रिज जवळील एका लॉजवर नेले व  महिलेवर बलात्कार केला. या वेळी आरोपीने महिलेचे फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार महिलेवर आत्याचार केले. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी महिलेने आपल्याबरोबर झालेला प्रकार पतीच्या कानावर घातला.

यानंतर ते सर्व त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी गेले; तरीही आरोपी सतत त्रास देत होता व महिलेला लग्नाची मागणी घालत होता. महिलेने लग्न करण्यास नकार दिला. आरोपीने महिलेचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर पोस्ट केले. तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शेवटी महिलेने आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तेथील स्थानिक पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. या प्रकरणी सुरज चंद्रकांत माने (२०, रा. धनकवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत