पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
टॅग: pune
नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार
मुंबई : राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण या जमिनींचा उपयोग […]
पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार
पुणे : पुण्यात लैंगिक अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूतानमधील एका २७ वर्षीय तरुणीवर सात पुरूषांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही तरुणी २०२० मध्ये कामाच्या शोधात भारतात बोधगया येथे आली. त्यानंतर ती पुण्यात राहायला आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख आरोपींपैकी एक असलेल्या ऋषिकेश नवलेशी झाली होती, ज्याने तिची ओळख त्याचा मित्र […]
पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील माळवाडी, गोकुळ नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्फोटात लागलेली आग विझवण्याचे […]
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नी, तनिषा भिसे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पैशांसाठी भिसे कुटुंबियांची रुग्णालय प्रशासनाने अडवणूक केली. मंत्रालयातून फोन जाऊनही कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. तनिषा भिसे यांना […]
पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका
पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे, कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीनेच या मुलाचे अपहरण केले होते. याप्रकरणी, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गजानन पानपाटील (२५) या कथित अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चिंचवड पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली की […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात आग, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात १ एप्रिलच्या रात्री आग लागली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. विद्यापीठाच्या कार्यकारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले की, मुलांच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांच्या मदतीने काही वेळातच आग विझवली. गेल्या महिन्यात विद्यापीठ परिसराजवळील जंगलात आग लागली होती […]
पुणे : मामाने भाच्याला चाकूने भोसकून ठार मारले, किरकोळ वादातून भयंकर कृत्य
पुणे : किरकोळ वादातून १५ वर्षीय भाच्याला त्याच्या मामाने चाकूने भोसकून ठार मारले. शुक्रवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पसार झालेल्या मामाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, कोळीवाडा, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) […]
पुण्यातील धक्कादायक प्रकार! पतीने त्याच्या मित्राला पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी घरी आणले, आणि…
पुणे : पुण्यात घरगुती छळाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ वर्षीय विवाहित महिलेने तिचा पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिस महिलेचा ३० वर्षीय पती आणि त्याचा ५० वर्षीय मित्र यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती बराच काळापासून तिचे शारीरिक शोषण करत होता. एकदा […]
पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला अटक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली चतुर्श्रृंगी पोलिसांनी अनिल वसंत गायकवाड या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंग्रजी विभागातून रसायनशास्त्र विभागाकडे जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी चालत असताना ही घटना घडली. गायकवाड यांनी त्यांच्याकडे पाहत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेला या घटनेची माहिती दिली. […]