पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नव्याने स्थापन झालेल्या पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पातील (५०० एमएलडी) आवश्यक कामांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या काळात रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद : पर्वती पंपिंग स्टेशन परिसर, पार्वती एलिव्हेटेड जलाशय परिसर आणि पर्वती ईएसआर टाकी […]
टॅग: pune
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५, नवीन २ लाख रोजगार संधी
मुंबई : राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असून माध्यम, मनोरंजन आणि ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्राला आता उद्योग […]
कंपन्यानी स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : इंदापूर तालुक्यात येणाऱ्या विविध कंपन्यांना उद्योगपूरक वातावरण निर्मितीकरिता आवश्यक ते सहकार्य येत आहे, कंपन्यानी आपल्या आस्थापनांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासह, उत्पादनासाठी स्थानिक कच्चा मालाला प्राधान्य द्यावे, सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे तालुक्याच्या सर्वागीण विकासाकरिता हातभार लावावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे इंदापूर पंचतारांकित औद्योगिक वसाहत लोणी येथील विविध विषयासंदर्भात […]
‘सारथी’च्या योजनांचा ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत विस्तार करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे, युवकांना रोजगाराभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. या […]
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
पुणे : सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, […]
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पुणे : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. […]
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट
पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार […]
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]
पीएमसी हद्दीत नव्याने सामील १६ गावांसाठी ३२३ कोटींचा ड्रेनेज प्रकल्प मंजूर
पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत नुकतेच सामील झालेल्या २३ पैकी १६ गावांमधील दीर्घकाळ प्रलंबित ड्रेनेज पायाभूत सुविधांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) योजनेअंतर्गत ३२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की या गावांमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) […]
राज्यातील ३८ नवीन सब स्टेशन उभारणी, वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करावीत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना या विकासासाठी उद्योग, कृषी आणि विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात वीज ऊर्जेची गरज भासणार आहे यासाठी महावितरणमार्फत उभारण्यात येणाऱ्या 38 नवीन सब स्टेशन आणि वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जावे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. एमएसईबी होल्डिंग कंपनी […]










