Pune: Agriculture Minister Dattatray Bharne Inspects Flood Damage in Sansar Village
पुणे महाराष्ट्र

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पुणे : सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिकांची ओढा खोलीकरणाची मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरणे यांनी दिले.

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत