Speech of Marathi Language Minister in English instead of marathi
पुणे महाराष्ट्र

आता बोला ! पुण्यात मराठी भाषा मंत्र्यांचे इंग्रजीत भाषण

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत होती, मात्र तरीदेखील मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी येथे इंग्रजीत भाषण केले. मराठी भाषा मंत्री असूनही भाषण करण्यासाठी मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजीत भाषण केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकीकडे राज्यपाल, मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना मराठी बोलण्याचा आग्रह धरतात, तर दुसरीकडे मराठी भाषा विभागाचे मंत्री इंग्रजीत भाषण करतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. देसाई यांनी भाषणाला सुरुवात मराठीतून केली. मात्र, नंतर त्यांनी इंग्रजीतून भाषण केलं. मराठी भाषा विभागाचे मंत्रीच मराठीत भाषण करीत नाही, तर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार कसा होईल, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत