41 crores will be made available for the memorial of revolutionary Chapekar brothers in Pimpri Chinchwad
पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार

मुंबई : पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत