Indonesian Navy Searches For Missing Submarine With 53 People On Board

इंडोनेशियामध्ये पाणबुडी बेपत्ता, पाणबुडीत ५३ जण असल्याची माहिती, शोध मोहीम सुरू

ग्लोबल

जकार्ता : इंडोनेशियामध्ये बाली बेटाजवळ एक पाणबुडी बेपत्ता झाली आहे. इंडोनेशियन नौदलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या पाणबुडीत ५३ जण असल्याची माहिती समोर आली आहे. पाणबुडीचा ज्या ठिकाणावरून संपर्क तुटला त्या भागात तेलाचे तवंग पसरल्याचे एका हेलिकॉप्टरला दिसून आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘केआरआय नानग्गला ४०२’ बुधवारी एका प्रशिक्षण अभियानात सहभागी झाली होती. त्यावेळी पाणबुडी बेपत्ता झाली.
जाहजंतो यांनी सांगितले की, नौदलाने या भागात सर्वेक्षण जहाजांसह अनेक जहाज पाणबुडीच्या शोधासाठी तैनात केल्या आहेत. बालीच्या उत्तरेला जवळपास ९५ किमी दूर अंतरावर पाणबुडी बेपत्ता झाल्याची माहिती लष्करप्रमुख हादी जाहजंतो यांनी दिली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाणबुडी समुद्रात ७०० मीटर खोल बुडाली असल्याचा नौदलाचा अंदाज आहे. पाणबुडी नेमकी कशी बेपत्ता झाली, याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. समुद्रात काही खोल अंतरावर गेल्यानंतर पाणबुडीशी संपर्क तुटला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. या पाणबुडीत चालक दलाचे ४९ सदस्य, त्याचे कमांडर आणि तीन गनर्स होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत