afganistan VP

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह थोडक्यात बचावले

ग्लोबल

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्याकडेला शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सालेह कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्ब हल्ला झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीचे तुकडे झाले. तसेच इमारतींचेही नुकसान झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या शत्रूंनी सालेह यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वाईट हेतूमध्ये त्यांना यश मिळाले नाही. सालेह या हल्ल्यातून बचावले. बॉम्बस्फोटात सालेह यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. त्यांचे काही बॉडीगार्ड या स्फोटात जखमी झाले आहेत अशी माहिती सालेह यांचे प्रवक्ते रझवान मुराद यांनी दिली.

दोन जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत