earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग! अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, 130 लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानला हादरवून सोडणाऱ्या 6.1 तीव्रतेच्या भूकंपात देशाच्या पूर्वेकडील किमान 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. बहुतेक मृत्यू पक्तिका प्रांतात झाले, जिथे 100 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले आहेत, असे तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन […]

bomb blast near mosque in peshawar of pakistan
ग्लोबल

काबूल एकापाठोपाठ चार स्फोटांनी हादरले, 16 ठार तर अनेकजण जखमी

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरा एकापाठोपाठ चार स्फोट झाले. उत्तरेकडील मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत आणि प्रवासी व्हॅनमध्ये तीन स्फोट झाले. मशिदीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. काबूल पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. उत्तर बल्ख प्रांतात प्रवासी व्हॅनमध्ये झालेल्या तीन स्फोटांत किमान नऊ जण […]

US Military Airstrike on ISIS
ग्लोबल

काबूल स्फोटानंतर अमेरिकेची दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

काबुल : काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात अमेरिकेच्या 13 सैनिकांसह अनेक लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 36 तासांच्या आत अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने पूर्व अफगाणिस्तानमध्ये ISIS च्या ठिकाणांवर […]

Afghan IT Minister Sayyad Ahmad Shah Saadat Is delivering Pizza In Germany
ग्लोबल

जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताय अफगाणिस्तानचे आयटी मंत्री

जर्मनी : अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती […]

Afghan woman give birth to baby girl in aboard us evacuation plane
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या महिलेने अमेरिकन लष्कराच्या विमानात दिला बाळाला जन्म

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानच्या एका महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत ही महिला अमेरिकेत जात होती. मात्र, विमानातच महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या. हवेचा दाब वाढल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. रामस्टीन एअर बेसवर पोहोचताच या महिलेने विमानामध्ये बाळाला जन्म दिला. अमेरिकेच्या हवाई दलाच्या […]

Bomb blast near school in kabul kills 25 people, 52 injured
ग्लोबल

काबूलमधील एका शाळेजवळ बॉम्बस्फोट, 25 ठार, ५२ जखमी

अफगाणिस्तान : पश्चिम काबूलमधील एका शाळेजवळ आज बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 25 जण ठार झाले, त्यापैकी अनेकजण तरुण विद्यार्थी आहेत. तर ५२ जण जखमी झाल्याची माहिती अफगाण सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सय्यद अल-शाहदा शाळेजवळ झालेल्या या स्फोटात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी येथे रुग्णवाहिकांची गर्दी झाल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन यांनी सांगितले. […]

afganistan VP
ग्लोबल

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह थोडक्यात बचावले

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्याकडेला शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सालेह कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्ब हल्ला झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीचे तुकडे झाले. तसेच इमारतींचेही नुकसान झाले आहे. […]