bomb blast near mosque in peshawar of pakistan
ग्लोबल

काबूल एकापाठोपाठ चार स्फोटांनी हादरले, 16 ठार तर अनेकजण जखमी

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरा एकापाठोपाठ चार स्फोट झाले. उत्तरेकडील मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत आणि प्रवासी व्हॅनमध्ये तीन स्फोट झाले. मशिदीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. काबूल पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उत्तर बल्ख प्रांतात प्रवासी व्हॅनमध्ये झालेल्या तीन स्फोटांत किमान नऊ जण ठार, तर 15 जण जखमी झाले आहेत. बल्ख प्रांताचे पोलिस प्रवक्ते मोहम्मद आसिफ वजेरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, हा हल्ला अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक असलेल्या शिया समुदायाला लक्ष्य करण्यासाठी होता. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सतत होत असलेल्या स्फोटांमुळे तालिबानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या शिया समुदायाला लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे.

काबूलचा राहणारा प्रत्यक्षदर्शी म्हणाला- “आम्ही इथे जवळच होतो तेव्हा खूप मोठा आवाज झाला. आवाज इतका मोठा होता की आम्हाला काही कळलेच नाही. हा स्फोट झकेरिया मशिदीत नमाज पढल्यानंतर झाला. पण बरेच लोक आत होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला जमिनीवर मृतदेह आणि बरेच लोक जखमी अवस्थेत आढळले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत