ED's big action against state transport minister and Shiv Sena leader Anil Parab
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीकडून नक्की कोणत्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आणि वाहतूक विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते. अनिल परब यांच्यावरील ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परब यांच्यावरही ईडीने थेट गुन्हाच दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. आता ईडीकडून अनिल परब यांना अटक केली जाणार का, हे पाहावे लागेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत