Tedros Adhanom Ghebreyesus WHO corona vaccine
कोरोना ग्लोबल

कोरोना केव्हा संपेल? WHO चे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं…

जगात सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण वाट बघत आहेत ती कोरोना लसीची. भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू  करण्यात आल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं की, “करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला अपेक्षा आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सर्व देश कोरोना व्हायरस पासून मुक्त होतील.

जागतिकीकरण, निकटता, कनेक्टिव्हिटी यामुळे कोरोना व्हायरस विजेच्या वेगाने जगभर पसरला, परंतु आपल्याला चांगल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल, त्यामुळे दोन वर्षापेक्षा कमी काळात  कोरोना संपण्याची आशा आहे, ”असे टेड्रॉस गेबेरियसस यांनी पत्रकारांना सांगितले.

कोरोनाने आतापर्यंत सुमारे 800,000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जगभरात जवळपास २.3 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत