कोरोना ग्लोबल

१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार

जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रशिया सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, Gam-Covid-Vac Lyo नावाचं हे वॅक्सिन 12 ऑगस्ट रोजी रजिस्टर करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये याचं मास-प्रोडक्शन सुरु करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर पासून देशभरात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

जगभरातील वैज्ञानिकांना चिंता आहे की, वॅक्सिन तयार करण्याच्या गडबडीत कोणतीही चूक होता कामा नये. तसेच या वॅक्सिनच्या उलट्या परिणामांचा सामना करावा लागू नये. परंतु, रशिया सर्वांच्या आधी वॅक्सिन लॉन्च करण्यासाठी धडपड करत आहे. तसेच रशियाकडून हे वॅक्सिन कोरोनावर प्रभावी असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. परंतु, यांच्या दाव्याला दुजोरा देणारी कोणत्याही वैज्ञानिकाची साक्ष प्रकाशित करण्यात आलेली नाही किंवा कोणताही वैज्ञानिक अहवाल प्रकाशित केलेला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

One thought on “१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत